10 ऑक्टोबरला रेखा 65 वर्षांची झाली. तिचे आयुष्य खूप अस्थिर होते.रेखा ला चित्रपटसृष्टीत 54 वर्षे झाली पण तिचा प्रवास कधीच सोपा नव्हता. बाल कलाकार म्हणून वयाच्या 11 व्या वर्षी रेखाने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. यानंतर ती वयाच्या 15 व्या वर्षी ‘अंजाना सफर’ चित्रपटातही दिसली. या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा आजही प्रसिद्ध आहे.
फिल्मच्या सेटवर जबरदस्तीने एक घटना घडवून आणली होती ज्यामुळे रेखा आतून खुप दुखावली होती.रेखा: द अनटोल्ड स्टोरी या चरित्रातही या घटनेचा उल्लेख आहे. यासेर उस्मान यांनी लिहिलेले हे पुस्तक सांगते की 1969 मध्ये आलेली ‘अंजाना सफर’ चे शूटिंग मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये चालू होते. राजा नवथे हे दिग्दर्शक आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार होते. एक दिवस चित्रपटाचा नायक विश्वजित आणि नायिका रेखावर एक रोमँटिक सीन चित्रित होणार होता.
सीन शूट करण्यापूर्वी त्याविषयी सर्व रणनीती आखली गेली होती. दिग्दर्शकाने ‘अॅक्शन’ म्हटताच विश्वजितने रेखाला बाहूंमध्ये भरुन घेतले आणि त्यांना कि-स करायला सुरुवात केली. हे पाहून रेखा थक्क झाली.तीला या किस बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.कॅमेरा चालुच राहिला, ना दिग्दर्शकाने कट संगितले ना विश्वजित थांबला. त्याने सलग पाच मिनिटे कि-स केले. हे पाहून युनिटचे सदस्य शि-ट्ट्या वाजवत होते.रेखाचे डोळे अश्रूंनी भरुन गेले होते.
विश्वजितने नंतर या घटनेविषयी सांगितले, की ही दिग्दर्शकाची कल्पना होती. त्या दोष नव्हता कारण तो दिग्दर्शकाच्या सूचना पाळत होता.हे मनोरंजनासाठी नव्हते तर त्या सीन चा एक महत्त्वाचा भाग होता. या दृश्यानंतर रेखाला खूप राग आला.या घटनेने तिला प्रचंड घाबरवल होतेे.