किशोर कुमार महिन्यातून फक्त दोन वेळाच भेटत असत पत्नी मधुबाला करण जाणून थक्क व्हाल!!

किशोर कुमार यांची निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी,व वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने झाले. अशोक कुमार यांनीच त्यांना चित्रपटात आणले. किशोर कुमारने आपल्या गायनाने तसेच आपल्या अभिनयाने लोकांवर खूप प्रभाव पाडला.आजही त्यांची गाणी मोठ्या उत्साहाने ऐकली जातात.

अभिनयाच्या दरम्यान किशोर कुमार यांनी दिग्गज अभिनेत्री मधुबालाची भेट घेतली. 1956 साली ‘ढाक के महल’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट झाली. त्यावेळी मधुबाला 27 वर्षांची होती.या दरम्यान मधुबाला ला तिच्या हृदयविकाराचे समजले,तरीही किशोर कुमारने तिला लग्नासाठी प्रस्ताव दिला.

दोघांनी 1960 साली लग्न केले. मात्र, किशोर कुमारचे हे दुसरे लग्न होते. किशोर कुमारच्या आई-वडिलांनी संगितले की -किशोर ने स्वत: च्या इच्छेनुसार आणि इतर धर्मातील मुलीशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा नाही.

मधुबालासाठी फ्लॅट विकत घेतले – पण दोघांनीही त्यांच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन हिंदू प्रथेनुसार लग्न केले. तरीही किशोरच्या पालकांनी मधुबालाला सून म्हणून स्वीकारले नाही. हनिमूननंतर किशोरने वांद्रेच्या क्वार्टर डेर येथे मधुबालासाठी फ्लॅट खरेदी केला.लग्नानंतर मधुबालाचा आजार आणखीन वाढू लागला. किशोरने या फ्लॅटमध्ये मधुबालासाठी नर्स व ड्रायव्हर ठेवले होते. मधुबालाचा आजार वाढत असताना किशोरने तिच्याकडे जाणे थांबवले. एक काळ असा होता की किशोर महिन्यातून दोन वेळा मधुबाला भेटायचे.

आर्थिक संकटाचा सामना करावा लागला – किशोर कुमार यांनाही मधुबालाच्या उपचारादरम्यान आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. किशोर कुमारकडे पैसे नव्हते. त्यांच्या घराचे फोन कनेक्शन ही तोडण्यात आले.पण किशोरकुमारने तिला आपली ताणलेली परिस्थिती कधीच जाणवू दिली नाही. यानंतर किशोर दोन-तीन महिन्यांतुन एकदा च मधुबाला भेटायचे.किशोरदा चे मधुबालासाठी या वर्तनावर लोकांनी प्रश्नचिन्ह उभे केले.

किशोर दा भेटला की मधुबाला रडायची – यावर किशोर कुमार म्हणाले की जेव्हा जेव्हा ते मधुबालाला भेटायला जात असत तेव्हा ती रडत असे, जे तिच्या हृदय आणि आरोग्यास अजिबात चांगले नव्हते. म्हणून, ते महिन्यातून दोनदा भेटायचे, जेणेकरून ती कमी रडेल.लग्नाच्या 9 वर्षानंतर मधुबालाचे ही निधन झाले.ती अवघ्या 36 वर्षांची होती.

Leave a Reply

Your email address will not be published.