रिया चक्रवर्ती-महेश भट्ट यांचे व्हाट्सएप चॅट झाली होती व्हायरल,वाचून थक्क व्हाल

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम ने मुंबई गाठली होती. या प्रकरणात आता सुशांतला न्याय मिळू शकेल अशी आशा सुशांतच्या कुटुंबिय आणि मित्रांनी व्यक्त केली होती.दरम्यान, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाली होते. ही चॅट सुशांतच्या मृत्यूच्या 6 दिवस आधीची आहेत म्हणजेच 8 जूनच्या रात्री 7:43 ते 8:08 दरम्यान ची आहे.

रियाने त्याच दिवशी सुशांतचे घर सोडले होते, जरी रियाने मुंबई पोलिस आणि ईडी यांच्या चौकशीत सांगितले होते की, सुशांतच्या सांगण्यावरूनच तिने घर सोडले होते, कारण त्याचे वडील त्यांच्या नात्यावर खुश नव्हते. पण या व्हायरल चॅट वरुण समजते की महेश भट्टने सुशांतसोबतचे संबंध संपवण्याचा सल्ला रिया ला दिला होता.

महेश भट्ट-रिया चक्रवर्ती यांचे व्हायरल चॅट-
महेश भट्ट यांच्या ‘जलेबी’ चित्रपटात रिया चक्रवर्तीच्या पात्राचे नाव होते आयशा.त्यामुळे गप्पांमध्ये रिया स्वत: ला आयशा म्हणत आहे.

रिया चक्रवर्ती: हिम्मतीने आणि आरामात आयशा पुढे जात आहे सर… तुमच्याशी अखेरच्या संभाषणाने माझे डोळे उघडले. तुम्हि माझे देवदूत आहेत,तुम्हि त्यावेळी माझ्या सोबत होता आणि अजूनही आहे.

रियाच्या या मेसेजवर महेश भट्टची प्रतिक्रिया धक्कादायक आहे.-
महेश भट्ट: मागे वळून पाहू नको. ते शक्य कर.., हे महत्वाचे आहे.तूझ्या वडिलांना माझे प्रेम दे.आता त्यांना खूप आनंद होईल. महेश भट्ट यांच्या या उत्तरावरून असे दिसते की रियाचे वडील या नात्यावर खुश नव्हते.त्यांना सुशांतसोबत रिया पहायची नव्हती.

रिया चक्रवर्ती: तुमचे शब्द मला धीर देतात सर. त्या दिवशी तुम्ही माझ्या वडिलांविषयी जे सांगितले त्याने मला दृढ होण्यास प्रेरित केले. नेहमीच सोबत राहिल्याबद्दल माझ्या वडिलांनी तुमचे आभार मानले आहेत.

महेश भट्ट: तु माझी मुलगी आहे, आता मला हलके वाटत आहे
रिया चक्रवर्ती: आह… शब्द नाहीत सर… माझ्या हृदयात तुमचे एक खास स्थान आहे. माझ्यासाठी तुम्हि सर्वोत्तम आहेत.
महेश भट्ट: धाडसी होण्याबद्दल धन्यवाद

रिया चक्रवर्ती: नशीबाचे धन्यवाद, ज्याने माझी आणि तुमची ओळख करुन दिली. तुम्ही बरोबर आहात कदाचित आपन फक्त या दिवसासाठीच भेटलो आहोत. आपल्यात काहीतरी वेगळंच आहे. तुम्हि बोललेले प्रत्येक शब्द माझ्या मनात प्रतिध्वनी आणतात आणि प्रेमाची तीव्र भावना ही जानवते.

महेश भट्ट: जर मी तुझ्या कामाला येऊ शकलो नाही,तर माझा असण्यात काही अर्थ नाही.

रिया चक्रवर्ती: तुम्हि मला पुन्हा मोकळे केले.ह्याच आयुष्यात दुसर्यांदा…एकदम देवासारखे
महेश भट्ट: विश्रांती घे

रिया चक्रवर्ती: खूप शांत वाटत आहे.
महेश भट्ट: वाढदिवसाच्या शुभेच्छा (महेश भट्ट त्याला रियाचा पुनर्जन्म म्हणत होते)

रिया चक्रवर्ती: हाहा-हाहा… मी आनंदी आहे.मी तुमच्यावर प्रेम करतते,माझे रेअल माणूस.एक दिवस मला माझ्याबद्दल अभिमान वाटेल.

महेश भट्ट: . खरंच.तू जे केल आहे त्या गोष्टींसाठी हिंमत लगते ..मागे वळू नको.

8 जून च्या संबंधित सुशांतचे कुटुंब आणि रिया वेगळी वेगळी कथा सांगत आहेत – 8 जून रोजी रियाने सुशांतला का सोडले याबद्दल सुशांतचे कुटुंब आणि रिया यांनी वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. सुशांतची बहीण मीतू च्या आनुसार रियाने तिला फ्लॅटवर बोलवले होते आणि सुशांतबरोबर तिचे भांडण झाल्याचे सांगितले. मीतू तिथे पोहोचली तेव्हा रिया गेली होती.सुशांतने बहिणीला दोघांमधील भांडणाबद्दल ही सांगितले.मीतूच्या म्हणण्यानुसार, ती 12 जूनपर्यंत सुशांतसोबत राहिली होती. परंतु नंतर तीचे मुले लहान असल्याने तीला घरी परत जावे लागले.

तर रियाने एक वेगळी कहाणी सांगितली.रियाने सांगितले की सुशांत त्याच्या मृत्यूआधी खूप अस्वस्थ होता.तो सतत रडत होता आणि आपल्या कुटूंबाला एकत्र राहण्यासाठी बोलवत होता.8 जून रोजी सुशांतने रियाला तिच्या घरी पाठवले जेव्हा त्याची मोठी बहीण मितू येऊन एकत्र राहण्यास तयार झाली.रियाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की सुशांतचे घर सोडताना तिला आनंद होत नव्हता ,पण आता रिया चक्रवर्तीची व्हॉट्सअॅप चॅट लीक झाली आहे,यावरून तिने सुशांतला स्वतः ने सोडले होते.

महेश-रियाच्या सान्निध्याबद्दल बरीच चर्चा झाली – रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट जवळीपणामुळे वारंवार चर्चेत येत असतात. सुशांतच्या निधनानंतर या दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सुशांतचे चाहते दोघांनावर खुप लक्ष्य थेवत आहेत.असाच एक व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहु शकता, पाहिल्यानंतर चाहत्यांनी महेश भट्टवर राग व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.