घराणेशाही सह हे स्टार किड्स बॉलिवूड पदर्पणसाठी आहेत सज्ज!!

बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर कितीही वाद-विवाद झाले,तरी देखिल स्टारकिड्स सिनेमांकडे येने कधीच थांबणार नाही. पुढील काळात काही बड्या स्टार्सची मुले बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना दिसू शकतात. अनेक स्टार किड्स अभिनयाचे प्रशिक्षणही घेत आहेत.

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचे आगमन होने काय नवीन गोश्ट नाही.गेल्या दोन वर्षांत ईशान खट्टर, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे अशा इंडस्ट्रीतील अनेक स्टार किड्सने डेब्यू केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पासून ते सुनील शेट्टी यांची मुलगी अहान शेट्टी अशी बरीचशी स्टार किड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतात.

१) सुहाना खान- सुहाना खान ने लंडनच्या आर्डींगली महाविद्यालयातून पदवी घेतली आहे आणि साध्या ती न्यूयॉर्क विद्यापीठात पुढील शिक्षण घेत आहे. सुहाना अलीकडेच – ‘द ग्रे पार्ट ऑफ़ ब्ल्यू’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. या शॉर्ट फिल्म चे शूटिंग तीच्या एका वर्गमित्रानी केले होते,असा अंदाज आहे की सुहाना लवकरच अभ्यास संपल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

२) शनाया कपूर- संजय कपूरची मुलगी शनाया कपूर देखिल खुप चर्चेत आहे. गेल्या वर्षी शनायाच्या सर्वात चांगल्या मैत्रिणीनेे अनन्या पांडे ने बॉलिवूड मधे पदार्पण केले होते. त्याचबरोबर शनायाने नुकताच तिच्या चुलत बहिनीच चा जान्हवी कपूर चा ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपट प्रदर्पण झाला आहे, मीडिया रिपोर्टनुसार शनायाला अभिनेत्री व्हायचं आहे, अशा परिस्थितीत शनाया लवकरच मोठ्या पडद्यावर दिसू शकेल असा अंदाज बांधला जाऊ शकतो.

3) अहान पांडे- अनन्याचा चुलत भाऊ अहान पांडे देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकतो. माध्यमांच्या वृत्तानुसार,अहान ला एका अनामिक चित्रपटासाठी यश राज फिल्म्सने कास्ट केले होते, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

4)अहान शेट्टी- त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये अण्णा म्हणून लोकप्रिय असलेल्या सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बद्दल जोरदार बातमी आहे की, तो ‘तडप’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अहानचा हा चित्रपट तडप साऊथच्या ‘आरएक्स 100’ चित्रपटाचा रिमेक असेल, ज्यामध्ये अहान सोबत तारा सुतारिया दिसणार आहे.

5) खुशी कपूर – या सर्व तार्‍यांबरोबरच जान्हवी कपूरची छोटी बहीण खुशी कपूर चे नाव ही अशा स्टार किड्समध्ये समाविष्ट आहे जे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतात. खुशी आजकाल न्यूयॉर्कमध्ये अभिनयाच्या युक्त्या शिकत आहे.

आणखी बातम्यासाठी आत्ताच लाईक बटण दाबा.

Leave a Reply

Your email address will not be published.