‘कौन बनेगा करोडपती’ या शो मध्ये 5 कोटी जिंकलेला सुशील कुमार झाला कंगाल, म्हणाला “शो जिंकल्यानंतर झाला विनाश!!”

कौन बनेगा करोडपती शोने देशातील अनेकांना करोडपती केले आहे. हा कार्यक्रम दरवर्षी येतो आणि या शोमध्ये भाग घेऊन लोक एका रात्रीतच लक्षाधीश होतात. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात अनेकांनी कोट्यावधी रुपये जिंकले आहेत. पण त्या सर्वांमध्ये सर्वोच्च सुशील कुमार होते. जे बिहारचे आहेत. या शोमध्ये सुशील कुमारने पाच कोटी रुपयांची बक्षिस जिंकले होते.

ही रक्कम सुशील कुमार यांनी 2011 मध्ये जिंकली होती. त्यावेळी या कार्यक्रमा ची सर्वोच्च रक्कम पाच कोटी होती आणि सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सुशील कुमारने हे पैसे कमावले. आज 10 वर्षानंतर सुशील कुमार पूर्णपणे रिकामे आहेत आणि त्यांच्याकडे एक रुपयाही शिल्लक नाही. सुशील कुमार इतकी मोठी रक्कम योग्यप्रकारे हाताळू शकले नाही आणि आज त्यांना या गोष्टीबद्दल फार वाईट वाटत आहे.

केबीसी जिंकल्यानंतर वाईट युगाची सुरुवात झाली – केबीसीमध्ये पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात किती वाईट अवस्था सुरू झाली हे सुशील कुमार यांनी सांगितले आणि ते वाईट सवयींच चे बळी ठरले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर सुशील कुमारला दारू आणि सिगारेटचे व्यसन लागले आणि हळूहळू त्यांचे पैसे संपू लागले.

सुशील कुमारने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट,पोस्ट करुन सांगितले की केबीसी जिंकल्यानंतर त्यांचे आयुष्य खूप कठीण झाले आहे. ते स्थानिक सेलिब्रिटी बनले आणि त्यांना बर्‍याच कार्यक्रमांना बोलावले गेले अस, ते बिहारमधील जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायचे. त्याचवेळी पाच कोटी मिळवल्यानंतर त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. पण त्यांचा कोणताही व्यवसाय चालू शकला नाही.

पाच कोटी पैकी सुशील कुमारने बरीच रक्कम गुपचूप दान केली होती. या व्यतिरिक्त त्यांना असे बरेच लोक सापडले ज्यांनी त्यांच्याकडून ही पैशाची फसवणूक केली. सुशील कुमार सांगतात की त्यांच्या बायकोने त्यांना या सर्व गोष्टी करु नका असे सांगितले होते. पण त्यांनी पत्नीचे म्हणणे ऐकले नाही आणि पत्नीबरोबरचे त्यांचे संबंधही बिघडू लागले.

सुशील कुमारने दिल्लीत वाहनांचा व्यवसाय सुरू केला आणि ते वेळोवेळी दिल्लीत येत असत. इथेच त्यांनी बर्‍याच लोकांशी मैत्री केली. त्यांच्याबरोबर राहताना त्यांना दारू आणि सिगारेटचे व्यसन झाले.दिग्दर्शक बनण्याचा प्रयत्न करीत सुशील कुमार यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केले. परंतु यात त्यांना यश आले नाही आणि त्यांचा वेळ ही गेला व त्यांनी खूप पैसे ही गमवले.

Leave a Reply

Your email address will not be published.